कणकवली कनकनगर येथे घरफोडून चोरी करणारा पोलिसांच्या जाळ्यात

कणकवली
कणकवली शहरातील कनकनगर येथील समृद्धी कोरगावकर यांच्या घरफोडीचा छडा एलसीबी सिंधुदुर्ग आणि कणकवली पोलीस स्थानकाच्या पोलीस पथकाने लावला असून साडेसहा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व चोरीला गेलेला अन्य ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. संतोष वसंत सुतार (४८) असे आरोपीचे नाव आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी मारुती जगताप यांच्या सूचनेनुसार कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, एलसीबी चे पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, एलसीबी पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, हवालदार पांडुरंग पांढरे, हवालदार डॉमनिक डिसोझा, हवालदार आशिष जामदार यांच्या पथकाने केली.