कणकवली येथे ‘प्रसंवाद २०२४’ वार्षिकांकाचे प्रकाशन.
कणकवली.
आज सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग या परिवर्तनवादी व फुले आंबेडकरी विचारांचे मुखपत्र म्हणून मान्यता पावलेल्या संस्थेच्या "प्रसंवाद २०२४ " या वार्षिकांकाचे प्रकाशन व अनावरण विद्यामंदिर कणकवली येथे प्रा.मोहन कुंभार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्या पिढीतील कवी व ललितलेखक प्रा.मोहन कुंभार,अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.राजेंद्र मुंबरकर, साहित्याचे अभ्यासक व विद्यामंदिरचे प्राचार्य पी.जे.कांबळे, संस्थाध्यक्ष अनिल जाधव, माजी अध्यक्ष सुनील हेतकर, सचिव राजेश कदम, माजी सचिव व कवी सिद्धार्थ तांबे, कवयित्री संध्या तांबे, कल्पना मलये सरीता पवार, रुपाली कदम, कवी व गायक जनिकुमार कांबळे, दीपक तळवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.