धामापूर येथे वर्षावास कार्यक्रम संपन्न.
मालवण
दि.बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग आणि तालुका शाखा मालवण यांच्या विद्यमाने गाव शाखा धामापूर डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे वर्षावास कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी आयुनी नेहा तांबे यांनी मार्गदर्शनपर बोलताना बाबासाहेबांचे महान कार्य आणि त्यांच्या पाठीशी उभी राहणारी त्यांची पत्नी रमाई हिचे कर्तृत्व आणि त्यांच्या संसारिक जीवनातील बोलके प्रसंग आजच्या स्त्रियांना त्यांनी पटवून दिले. वर्षावास कार्यक्रमात बौद्ध धर्मातील आदर्श स्त्री रत्ने या प्रमुख विषयावर त्यांनी प्रवचनादवारे मार्गदर्शन केले. तसेच यावेळी आनंद धामापूरकर यांनी ही मार्गदर्शन केले.व पदाधिकाऱ्यानी वर्षावासाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन, बुद्ध वंदना, त्यानंतर कार्यक्रमाचे प्रस्ताविक विलास नाईक यांनी करत जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्याचे स्वागत करण्यात आले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष विद्याधर कदम, जिल्हा पदाधिकारी, तथा डॉ.आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त चंद्रकांत जाधव, आयु.धामणकर, पुरुषोत्तम मालवणकर, आनंद धामापूरकर, बबन मालवणकर, धामापूर गावशाखा अध्यक्ष सुजय कदम, विलास नाईक, संजय जाधव, साक्षी नाईक, सोनम कदम, वृषाली नाईक, लिलावती कदम, संजना जाधव अविनाश नाईक, कृणाल नाईक, सानिया जाधव आणि गाव शाखेचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.