परुळे पंचक्रोशीतील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.
वेंगुर्ला.
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वेंगुर्ला तालुक्यातील परूळे पंचक्रोशीतील शेकडो उ.बा.ठा सेनेच्या कार्यकर्त्यानी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.यावेळी प्रवेशकर्त्याचे पालकमंत्र्यानी स्वागत केले. माजी सभापती निलेश सामंत यांच्या कामावर प्रभावीत होऊन बहुसंख्य कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला.परुळे येथे पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, प्रदेश उपाध्यक्ष प्रसन्न देसाई तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा कार्यकारीणी सदस्य मनवेल फर्नाडीस, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, सरपंच संघटनेचे पप्पू परब, माजी सभापती निलेश सामंत, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर, परुळे बाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर उपसरपंच संजय दुधवडकर, माजी सरपंच तथा सदस्य प्रदिप प्रभु भोगवे उपसरपंच रुपेश मुंडये, माजी सरपंच, सुनील राऊत शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे, सुनील चव्हाण, प्रकाश राणे, गुरुनाथ मडवळ, चीपी उपसरपंच प्रकाश चव्हाण साईनाथ माडये, यांसह ब हुसंख्य भाजपा कार्यकर्त उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी भाजपा पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्याचे स्वागत केले. व त्यांना पक्षात काम करताना योग्य तो सन्मान दिला जाईल असे आश्वासीत केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या,कार्यावर प्रभावीत होऊन भाजपा पक्षात कामकरणाऱ्यांची संख्या वाढत आहे.आपण सर्वजण एक कार्यकर्ता म्हणुन काम करून पक्षाला वाढीसाठी प्रयत्न करूया असे मत व्यक्त केले.
यावेळी परुळे वासीयांच्या वतीने पालकमंत्री यांचा सन्मान करण्यात आला.विमानतळात बाबत विमान कंपनीच्या अनियमित सेवेमुळे परुळे गावांसह सिंधुदुर्ग विमानतळचे नाव खराब होत आहे. याबाबत तुम्ही विचार करून नवीन विमान कंपनी नियुक्त करावी आणि परुळे पंचक्रोशीतील प्रलंबित विकास कामांना चालना द्यावी असे निलेश सामंत यानी सूचना मांडली आणि त्यांनी सुचविलेल्या कामांना त्यांनी तात्काळ पूर्ण करण्याचे वचन पालकमंत्री यानी दिले.यावेळी परुळे रिक्षा संघटनाच्या 35 सदस्य, गवानवाडी येथील दिपा सुभाष दाभोलकर यांसह 50 कार्यकर्ते, मोहन वाडेकर महादेव राऊळ आदींसह पक्षप्रवेश संपन्न झाला.