बीडवाडी येथील श्री गुरुदेव दत्त मंदिरात उद्या रामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

बीडवाडी येथील श्री गुरुदेव दत्त मंदिरात उद्या रामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

कणकवली.

  श्री गुरुदेव दत्त मंदिर उत्सव समितीतर्फे बीडवाडी येथील श्री गुरुदेव दत्त मंदिरात बुधवार १७ एप्रिलला राम नवमी उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.
   सकाळी ७ वा. श्रींची महापूजा, ९ वा. श्री राम पंचायतन पूजा, १० वा. ह. प. प. संदेश गोसावी यांचे कीर्तन, १२.२ वा. श्री राम जन्मोत्सव सोहळा, महाआरती, तीर्थप्रसाद, १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. भजनांचा कार्यक्रम, रात्री १० वा. श्री गणेश भवानी दशावतार नाट्यमंडळ, हुंबरट यांचा प्रयोग सादर होईल. तरी या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.