वेंगुर्ला आनंदवाडी येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी.

वेंगुर्ला आनंदवाडी येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी.

वेंगुर्ला

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वेंगुर्ला आनंदवाडी, बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई, शाखा वेंगुर्ला तालुका व शहर शाखा, दलित सेवा मंडळ वेंगुर्ला, व सावित्रीबाई आंबेडकर महिला मंडळ वेंगुर्ला, यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११ एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती समाज मंदिर आनंदवाडी येथे साजरी करण्यात आली.तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त माधवबाग कुडाळ शाखा यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.
   कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून,दिप प्रज्वलित करण्यात आले.
    या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते राहुल कुंभार यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारीत आपले विचार मांडले.तसेच माधवबागचे डॉ.समिक्षा रहाटे, वाय.जी कदम, प्रेमानंद जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
    यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष विठ्ठल जाधव, उपाध्यक्ष गजानन जाधव, उपाध्यक्षा मोनाली जाधव, सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई, शाखा वेंगुर्ला तालुका अध्यक्ष प्रेमानंद जाधव, दलित सेवा मंडळ अध्यक्ष सुहास जाधव, सावित्रीबाई महिला मंडळ अध्यक्षा सुहानी जाधव, सखाराम जाधव, वामन कांबळे, जयंत जाधव, सुरेश जाधव, वृषाली जाधव, सेवानिवृत्त जिल्हा न्यायालय अधीक्षक एन.पी.मठकर, माधवबाग शाखा कुडाळचे डॉ.अमेय पाटकर, डॉ.समिक्षा रहाटे, राकेश सोनवडेकर, कृतिका सपकाळ, निशा पावसकर, संदीप चेंदवणकर तसेच धम्म बांधव- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लाडू जाधव यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार विठ्ठल जाधव यांनी मानले.