वागळे, आव्हाड यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देणार; वेंगुर्लावासीयांचा निर्धार. वेंगुर्ला येथे 'मी सनातन धर्मरक्षक' अभियानांतर्गत बैठक संपन्न.

वागळे, आव्हाड यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देणार; वेंगुर्लावासीयांचा निर्धार.  वेंगुर्ला येथे 'मी सनातन धर्मरक्षक' अभियानांतर्गत बैठक संपन्न.

वेंगुर्ला.

   महाराष्ट्रात निखिल वागळे यांच्यासारखे पत्रकार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हेही सनातन धर्म संपविण्याच्या भूमिकेला पाठिंबा घोषित करून सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे, अशा प्रकारची हिंदू धर्मा वर विखारी टीका करत आहेत. हे वेळीच रोखण्यासाठी धर्माच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या वागळे आणि आव्हाड यांच्या विरुध्द पोलिसांकडे तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याचा निर्णय वेंगुर्लावासीयांनी बैठकीत केला.
  साई दरबार सभागृह, वेंगुर्ला येथे सनातन धर्म नष्ट करणाऱ्यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती तर्फे "मी सनातन धर्मरक्षक" अभियाना अंतर्गत सनातन धर्म नष्ट करण्याचे अर्बन नक्षलवाद्यांचे षडयंत्र या विषयावर बैठक आयोजित केली होती.यावेळी सनातन संस्थचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी पुरव्या सह सचित्र माहिती दिली. २०१५ ते १९या ४ वर्षात सिंधुदुर्गात परदेशातून ६५०० कोटी रुपये आले आहेत हे FCRA कायद्या अंतर्गत शासनाने उघड केले आहे. ते पैसे कशासाठी आले, त्या पैशांचा विनियोग नक्की कशासाठी केला गेला.जिल्ह्यात गांजा, ड्रग सारख्या प्रकणात तरुण हिंदू मुलांना गुंतवून त्यांचे आयुष्य बरबाद करण्याचा डाव सुरू आहे, त्यामुळे या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोलीस यंत्रणा पोहचण्यासाठी प्रयत्न करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.
आज अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच अनेक मिशनरी स्कुल साठी परदेशातून करोडो रुपये निधी येत आहे,  या निधीचा उपयोग पद्धतशीर पणे हिंदू धर्मावर आघात करण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे या बाबत समाजामध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे, आणि ती आपण करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
तसेच मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराकडून सेंट झेवीयर सारख्या इंग्रजी माद्यमाच्या शाळेना १० लाख रुपये निधी दिला जातो यापुढे आपल्या मंदिर उभारणीसाठी त्यांच्याकडे निधीची मागणी करण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.
   मुख्य बैठकीनंतर झालेल्या चर्चेत उपस्थित धर्मबांधवानी पुढील कृतिशील दिशा ठरविली यावेळी ऍड.सौ. सुषमा प्रभुखानोकलर, सर्वश्री आशिष पाडगावकर, विजय रेडकर, श्री. लिंगोजी, शिवदत्त सावंत, चंद्रहास नार्वेकर, महेश वेंगुर्लेकर, अजित राऊळ, प्रताप गावस्कर , सौ. वृंदा गवंडळकर, सुधाकर धोंड, श्रीकृष्ण पेडणेकर यांच्या सह अन्य धर्माभिमानी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार महेश जुवलेकर यांनी मानले.