मातोश्री कला क्रीडा मंडळ दाभोलीनाका सार्वजनिक नवरात्रौत्सव अध्यक्षपदी विलास गावडे तर उपाध्यक्षपदी उपेंद्र तोटकेकर.
वेंगुर्ला.
मातोश्री कला क्रीडा मंडळ , दाभोलीनाका - वेंगुर्ले ची नवरात्रौत्सव नियोजनाची बैठक मंडळाचे अध्यक्ष विष्णुदास उर्फ दादा कुबल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . यावेळी सन २०२३ च्या नवरात्रौत्सव कमिटी अध्यक्षपदी उद्योजक विलास गावडे व उपाध्यक्षपदी उपेंद्र तोटकेकर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
सलग २८ वर्षं हा नवरात्रौत्सव दाभोलीनाका येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम व स्पर्धा आयोजित करून करण्यात येतो. वेंगुर्ले तालुक्यातील सर्वात पहिल्या नवरात्रौत्सवाची सुरुवात याठिकाणी करण्यात आल्यामुळे वेंगुर्ले तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते मंडळी व प्रतिष्ठित नागरिक या नवरात्रौत्सवाला भेट देतात.ह्यावर्षीही या नवरात्रौत्सवात रेकॉर्ड डान्स स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, दशावतारी नाटक, आॅक्रेस्टा, महिलांसाठी फुगडी, विनोदी नाटक, दांडीया असा नऊ दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दाभोलीनाका येथील कार्यालयात आलेल्या बैठकीत प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, सुहास गवंडळकर, वसंत तांडेल, जयंत मोंडकर, प्रभाकर आजगावकर, संदेश निकम, श्रीकांत रानडे, राघवेंद्र जोशी, शरद मेस्त्री, प्रमोद वेर्णेकर, तुषार साळगांवकर, अविनाश सडवेलकर, भुषण आंगचेकर, भुषण सारंग, हेमंत गावडे, प्रफुल्ल प्रभु, तन्मय जोशी, राहुल मडकईकर, विधाता सावंत, प्रकाश डिचोलकर, दादा केळुसकर, नामदेव सरमळकर, गौरेश वायंगणकर, मारुती दोडशानट्टी, अनंत मिंडे, प्रसाद मांजरेकर, प्रसाद केरकर, ऋत्विक आंगचेकर, गिरगोल फर्नांडीस, भानुदास मांजरेकर, शशी करंगुटकर इत्यादी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.