वेंगुर्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मासिक सभा संपन्न

वेंगुर्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मासिक सभा संपन्न

 

वेंगुर्ला

 

      राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेंगुर्लेची मासिक सभा वेंगुर्ला म्हाडा कॉलनी जवळील काथा कारखाना येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर यांनी प्रदेश चिटणीस एम.के. गावडे आणि महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई परब यांचे स्वागत केले. या बैठकीमध्ये संघटनेबाबत सभासद नोंदणीचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद तुळस मतदारसंघांमध्ये विभागीय अध्यक्ष सचिन पेडणेकर, जिल्हा परिषद उभादांडा मतदारसंघांमध्ये विभागीय अध्यक्ष सॅमसन फर्नांडिस, जिल्हा परिषद आडेली मतदार संघामध्ये विभागीय अध्यक्ष सुनील नाईक या सर्वांची सर्वानुमते निवड करण्यात आली.उरलेले दोन जिल्हा परिषद मतदार संघ म्हापण आणि रेडी या मतदारसंघांमध्ये देखील विभागीय अध्यक्ष लवकरच निवडला जाईल असे तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर यांनी सांगितले. यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील विकास कामाबाबत आढावा घेण्यात आला तसेच गोरेवाडी-वेंगुर्ला जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे व पुलाच्या बांधकामाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे कामाच्या मंजुरीसाठी निवेदन देण्याचे ठरवण्यात आले. प्रदेश चिटणीस एम. के. गावडे यांनी वेंगुर्ला संघटनेबाबत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीमध्ये जिल्हा सचीव सुशील चमणकर, तालुका सरचिटणीस संतोष राऊळ, तालुका उपाध्यक्ष सुभाष दळवी, तालुका चिटणीस संदीप सातार्डेकर, युवक तालुका अध्यक्ष  गजानन कुंभार, ओबीसी उपाध्यक्ष चंद्रशेखर मांजरेकर, सचिन पेडणेकर, सॅमसंग फर्नांडिस, महिला तालुकाध्यक्ष ऋतुजा शेटकर, महिला उपाध्यक्ष साधना शिरोडकर, कमळ तोडकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.