जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत कासार्डे विद्यालयाचे उज्वल यश.
कणकवली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग, आणि सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय योगासने स्पर्धा कासार्डे माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज कासार्डे येथे नुकत्याच पार पडल्या.या स्पर्धेत कासार्डे विद्यालयाच्या खेळाडूंनी उज्वल यश संपादन करून आपली स्पर्धेतील यशाची परंपरा कायम राखली आहे.
या स्पर्धेत यशस्वी झालेले विद्यालयाचे स्पर्धक असे आहेत :-
14 वर्षाखालील मुलींच्या गटात १) कु. दुर्वा प्रकाश पाटील (इयत्ता आठवी) ट्रॅडिशनल प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला 14 . वर्षाखालील मुलांच्या गटात २) कल्पेश उदय निकम. (इयत्ता आठवी) ट्रॅडिशनल प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला.
17 वर्षाखालील मुलांच्या गटात ३) मयूर सुभाष हाडशी (इयत्ता दहावी) ट्रॅडिशनल प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला.
19 वर्षाखालील मुलींच्या गटात
४) कु. सानिका प्रवीण मतलवार (इयत्ता बारावी) ट्रॅडिशनल प्रकारात प्रथम क्रमांक.
19 वर्षाखालील मुलींच्या गटात रिदमिक योगा प्रकारात ५) कु. सानिका प्रवीण मतलवार. (इयत्ता बारावी) प्रथम क्रमांक मिळवला आहे.
हे सर्व खेळाडू कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले असून या सर्व खेळाडूंना विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक संजय भोसले, श्रीमती प्रियंका सुतार, विद्यालयाचे क्रीडाशिक्षक दत्तात्रय माकड यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. याशिवाय या स्पर्धा पार पाडण्यासाठी राज्य जज परीक्षा उत्तीर्ण झालेले तेजल कुडतरकर, विद्यालयाचे शिक्षक नवनाथ काणकेकर आणि क्रीडा विभागातील इतर सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. या सर्व यशस्वी खेळाडूंना आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, शाळा समिती चेअरमन अरविंद कुडतरकर, विद्यालयाचे प्राचार्य एम डी खाड्ये, पर्यवेक्षक एन सी कुचेकर आणि विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या स्पर्धा पार पाडण्यासाठी पालक वर्गानेही बहुमोल कामगिरी बजावली आहे.