काहीही झाले तरी येथील जनता विकासाच्या मुद्यावर माझ्या पाठिशी - शिक्षणमंत्री दिपक केसरकर

काहीही झाले तरी येथील जनता विकासाच्या मुद्यावर माझ्या पाठिशी - शिक्षणमंत्री दिपक केसरकर


सावंतवाडी 

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपक केसरकर यांनी आज सावंतवाडी येथील आपल्या निवासस्थांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, येत्या दोन दिवसात मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या प्रमाणे शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा होणार आहे. त्यानंतर सावंतवाडी विधानसभेत मी निवडणुकीला चौथ्यांदा सामोरा जाणार आहे. या ठिकाणी खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण माझ्या प्रचारात उतरले की माझा विजय निश्चित आहे.आत्ताच्या निवडणूकीत मी उभा राहणार नव्हतो. परंतू मी जिल्ह्यात आणलेली विकासकामे पुर्ण करायची आहेत. आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कोकण समृध्द करायचा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणूकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.काही झाले तरी येथील जनता विकासाच्या मुद्यावर माझ्या पाठिशी राहणार आहे.दरम्यान राजन तेली यांनी माझ्यावर किती ही टिका केली तरी माझी त्यांच्याशी स्पर्धा नाही.ते जितकी माझ्यावर टिका करतील तितकेच येथील जनता त्यांच्या विरोधात जाईल. मात्र काही झाले तरी बाहेरुन आलेल्या तेलींना येथील जनता तिसऱ्यांदा पराभूत करून कणकवलीला पाठवेल.