राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांचा सत्कार.

राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांचा सत्कार.

कणकवली.

   बेळगाव येथे सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ओसरगाव ग्रामपंचायत
च्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसभेमध्ये शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
   त्याप्रसंगी सरपंच सौ सुप्रिया कदम, उपसरपंच गुरुदास सावंत, ग्रामसेवक संजना अंगणी, पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप तळेकर, गजानन तळेकर, सदा मोरे, राहूल आगणे, विद्या मेस्त्री, नाना परब, संतोष कदम, नाथा नालंग वारंग व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
    गेली पंचवीस वर्ष सामाजिक, धार्मिक, क्रीडा, आरोग्य, शैक्षणिक, राजकीय वेगवेगळ्या क्षेत्रात व विशेषता अपघातग्रस्तांना अहोरात्र मदत करत असल्यामुळे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांच्या शुभहस्ते 28 ऑक्टोबरला बेळगाव येथे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानिमित्ताने गावाच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी बबली राणे यांनी सर्वांचे आभार मानले. 25 वर्षे केलेल्या कामाचे कुठेतरी पोचपावती मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जिल्हा पोलीस मुख्यालयातून शिफारस करण्यात आली होती. याही पुढे चांगलं काम करण्याची शक्ती गावची ग्रामदैवत श्री लिंग माऊलीने द्यावी अशी भावना बबली राणे यांनी व्यक्त केली.