शासनमान्य कल्पवृक्ष अकॅडमीच्या वतीने गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी.

शासनमान्य कल्पवृक्ष अकॅडमीच्या वतीने गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी.
शासनमान्य कल्पवृक्ष अकॅडमीच्या वतीने गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी.

वेंगुर्ला.

   शासनमान्य कल्पवृक्ष अकॅडमी वेंगुर्ला यांच्या वतीने मठ ग्रामपंचायत येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
   गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून माजी नगरसेविका सुमन निकम, समाजसेविका सिमा नाईक, जि.प.शिक्षिका रेश्मा वरसकर यांचा अकॅडमीच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच नृत्यातील ‘कथ्थक’ प्रकारात अकॅडमीच्या प्रथम परिक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले.तसेच ॲकडमीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य आविष्कार सादर केले.
   यावेळी अकॅडमीचे उपाध्यक्ष उत्तम मोबारकर, सचिव उमेश पेडणेकर, खजिनदार रेश्मा शारबिद्रे, वेदांग पेडणेकर, गोपाळ बागायतकर, अकॅडमीचे विद्यार्थी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदांग पेडणेकर यांनी केले तर आभार कल्पवृक्ष अकॅडमीच्या अध्यक्षा उर्मिला पेडणेकर यांनी मानले.