जिल्ह्यातील इच्छुक व पात्र गोशाळा संस्थानी २५ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करा. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.खरे यांचे आवाहन.

सिंधुदुर्ग.
पशुसंवर्धन विभागांतर्गत सन २०२४-२५ मध्ये राज्यस्तरीय योजने अंतर्गत सुधारित गोवर्धन गोवश सेवा केंद्र या योजनाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक व पात्र गोशाळा संस्थानी विहित नमुन्यातील अर्ज व परिपूर्ण प्रस्ताव दिनांक २५ ऑगस्ट २०२४ पर्यंत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ज्योती खरे यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उर्वरीत ०८ तालुक्यातून यासाठी सन २०२४-२५ करिता पात्र व इच्छुक गोशाळा संस्थांनी या योजनेचे उद्देश, वेळापत्रक गोशाळा लाभार्थी निवडीच्या अटी / शर्ती. निवडीची प्रक्रिया तसेच योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज व इतर जोडावयाची अनुषंगिक कागदपत्रे तसेच मार्गदर्शक सूचना इ. बाबतची सविस्तर माहिती तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचेकडे उपलब्ध करून देणेत आलेली आहे. आयुक्त पशुसंवर्धन कार्यालयाकडे थेट किंवा ईमेल द्वारे सादर केलेले प्रस्ताव ग्राह्य धरले जाणार नाहीत असेही कळविण्यात येत आहे.