शासकीय वसतीगृहामध्ये २० सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करा. समाज कल्याण विभाग सहायक आयुक्त संतोष चिकणे यांचे आवाहन.
सिंधुदुर्ग.
समाजिक न्याय विभागाअंतर्गत जिल्ह्यातील शासकीय वसतीगृहामध्ये सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी वसतिगृहातील रिक्त असलेल्या जागेवर प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पध्दतीने दि. 20 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
शासकीय वसतिगृहासाठी व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रीया ऑफलाईन पध्दतीने येत असून सन 2023-24 मध्ये शासकीय वसतीगृहातील प्रवेश प्रक्रिया शासकीय वसतिगृहातील रिक्त असलेल्या जागावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. मागासवर्गीय विद्यार्थी/ विद्यार्थींनीनी वसतिगृह प्रवेश अर्ज विनामूल्य प्राप्त करुन घेण्यासाठी कार्यालयीन वेळेत संबंधित वसतिगृहातील गृहपाल, अधिक्षीका यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या 02362 228882 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वसतिगृह पुढीलप्रमाणे आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण – 02365-251323. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कणकवली – 02367-231321. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वेंगुर्ला-02366-262435. मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मालवण -02365-251803. मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, कणकवली -02367-230454. मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,सावंतवाडी -02363-273097.मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, देवगड- 02364-262170. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, वेंगुर्ला-02366-262534.
तरी जे मागासवर्गीय विद्यार्थी, विद्यार्थीनी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास इच्छुक असतील अशा विद्यार्थ्यांनी वरील वेळापत्रकानुसार ऑफलाईन पध्दनीने अर्ज संबंधित वसतिगृहांकडून विनामुल्य उपलब्ध करुन परिपुर्ण भरुन व सर्व कागदपत्रासहित वसतिगृहात सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.