फणसवळे ग्रामपंचायत टिमने केली परुळेबाजर ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांची पाहणी.

फणसवळे ग्रामपंचायत टिमने केली परुळेबाजर ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांची पाहणी.

वेंगुर्ला.

  तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतीला जिल्हा रत्नागीरी फणसवळे ग्रामपंचायत टिमने अभ्यास दौऱ्याअंतर्गत भेट दिली व विविध उपक्रमांची पाहणी केली.या अभ्यास  दौऱ्याअंतर्गत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायात परुळेबाजार येथे भेट दिली.
  यावेळी परुळे बाजार ग्रामपंचायत सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुधवडकर, माजी सरपंच तथा सदस्य प्रदिप प्रभू, ग्रामसेवक शरद शिंदे, कर्मचारी शंकर घोगळे आदी उपस्थित होते.
   यावेळी ग्रामपंचायतीच्या  परुळेबाजार अंगणवाडी व्यायामशाळा, काथ्या प्रकल्प, प्लॅस्टीक संकलन व प्रक्रिया युनीट सांडपाणी पुर्नवापर युनिट याची पाहणी केली यावेळी.  ग्रा.प- तीच्या कामाचे कौतूक केले.तसेच
ग्रामपंचायतने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राज्यस्तरीय यश मिळवले आहे त्याबद्दल अभिनंदन केले.