मालवण येथे ८ ऑगस्टला राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धा

मालवण येथे ८ ऑगस्टला राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धा

 

मालवण
 

   सतीश आचरेकर मित्रमंडळ आयोजित दादा आचरेकर स्मरणार्थ भव्यदिव्य राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धा ८ ऑगस्टला मालवण बंदर जेटी येथे होणार आहे.ही स्पर्धा ३२ स्पर्धकांमध्ये रंगणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांक १ लाख ११ हजार १११ रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक ५५ हजार ५५५ रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक १५ हजार ५५५ रुपये व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक ११ हजार १११ रुपये व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट शिस्तबद्ध संघास व उत्कृष्ट प्रहार यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे खास आकर्षण म्हणून आकर्षक चषक असणार आहे. सर्व स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण असणार आहे. अधिक माहितीसाठी आनंद आचरेकर ९३२५२०१३७५, सतीश आचरेकर, संजय घरत, सागर तिगडी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.