रत्नागिरी पंचायत समितीमार्फत तीन दिवसीय पशुसंवर्धन प्रशिक्षणाचे आयोजन. १५ जुलै पर्यंत अर्ज करण्याचे पशुधन विकास अधिकाऱ्यांचे आवाहन.

रत्नागिरी पंचायत समितीमार्फत तीन दिवसीय पशुसंवर्धन प्रशिक्षणाचे आयोजन.  १५ जुलै पर्यंत अर्ज करण्याचे पशुधन विकास अधिकाऱ्यांचे आवाहन.

रत्नागिरी.

    पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत विशेष घटक योजना अनुसूचित जातीच्या लाभधारकांना पशुसंवर्धन विषयक 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यात दिनांक 15 जुलैपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन पुशधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. आदिती कसालकर यांनी केले आहे.
   प्रशिक्षणामध्ये पशुपालकांना दुग्धव्यवसाय, शेळीपालन तसेच कुक्कुटपालन विषयक सविस्तर माहिती देण्यात
येणार आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या पशुपालकाना पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
   यासाठी फोटो, आधारकार्ड सत्यप्रत, रहिवासी दाखला, अपत्य दाखला, रेशनकार्ड सत्यप्रत, जातीचा दाखला सत्यप्रत या कागदपत्रांची आवश्यकता आहे. तरी तालुक्यातील इच्छुक पशुपालकांनी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना अथवा पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.