देवगड पंचायत समिती येथे पाणी गुणवत्ता प्रशिक्षण संपन्न.

देवगड.
शुद्ध व सुरक्षित पाणी पुरवठा होण्यासाठी पाण्याची गुणवत्ता चांगली असणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत कडून करण्यात येणारी कार्यवाह अधिक परीणामकारक निर्दोष व नियोजनद्ध व्हावी व जनतेला शुद्ध सुरक्षित पाणी पुरवठा व्हावा यासाठी असे प्रशिक्षण आयोजन करण्यात येते असे प्रतिपादन उपविभागीय समन्वयक पाणी गुणवत्ता देवगड श्रीम. हर्षदा बोथीकर यांनी मार्गदर्शन करताना केले.
या प्रशिक्षणात शिरगांव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ग्रामपंचायतीमधील जलसुरक्षक उपस्थित होते. यावेळी पाणी शुद्धीकरण बाबत घ्यावयाची काळजी, टी. सी. एल पावडर साठवण व निगा, जलसुरक्षक जबाबदाऱ्या व कर्तव्ये, प्रयोगशाळेत जैविक तपासणी व रासायनिक तपासणीसाठी करावयाची wQmis वर ऑनलाईन एन्ट्री बाबत मार्गदर्शन तसेच गावस्तरावर शुद्धीकरणासाठी उपलब्ध असलेले अणुजैविक फिल्ड टेस्ट किट्स व रासायनिक पाणी नमुने तपासणीसाठी मल्टी पॅरामीटर किट बाबत मार्गदर्शन उपविभागीय समन्वयक पाणी गुणवत्ता देवगड श्रीम. हर्षदा बोथीकर यांनी केले.