वेंगुर्ला तालुका विज्ञान प्रदर्शनात अणसूर पाल हायस्कूलची विज्ञान प्रतिकृती प्रथम
वेंगुर्ला
दि. १० व ११ डिसेंबर या कालावधीमध्ये वेंगुर्ला हायस्कुल वेंगुर्ला येथे ५२ वे वेंगुर्ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.यात ९ वी ते १२ वी या माध्यमिक गटात अणसूर पाल हायस्कूल अणसूर शाळेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थी साहिल दिपक गावडे याने स्वअभ्यासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अल्पखर्चिक सुक्ष्मदर्शक- प्लास्टोस्कोप या विज्ञान प्रतिकृतीचे सादरीकरण केले होते. या विज्ञान प्रतिकृतीने माध्यमिक गटातून तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला आहे.यासाठी विज्ञान शिक्षक विजय ठाकर यांचे सहील ला मार्गदर्शन लाभले. प्रथम क्रमांक मिळविलेल्या साहिल व मार्गदर्शक ठाकर सर यांना वेंगुर्ला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी वेंगुर्ला हायस्कूल चे मुख्याध्यापक तथा आयोजक पि.डी. कांबळे, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ संचालक संतोष पवार व मान्यवर उपस्थित होते.या प्रदर्शनात ६ वी ते ८ वी प्राथमिक गटात, शाळेच्यावतीने इयत्ता आठवीतील सोहम संजय अणसूरकर या विद्यार्थ्यांने जल अपव्यय टाळण्यासाठी स्मार्ट जलबचतदर्शक यंत्र ही विज्ञान प्रतिकृती सादर करून सहभाग घेतला तसेच धनश्री गावडे, वेदांत गावडे, समिक्षा गावडे, साहिल सुनील गावडे, श्रेयश मालवणकर, वेदांत आमडोसकर यांनी वक्तृत्व, निबंध, प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धेत सहभाग घेतला होता. या सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे, अणसूर पाल विकास मंडळ, मुंबई संस्थाध्यक्ष आत्माराम गावडे, सेक्रेटरी लिलाधर गावडे, ट्रेझरर बाळकृष्ण तावडे तसेच शालेय समिती अध्यक्ष मातोंडकर, सदस्य दिपक गावडे, दत्ताराम गावडे, देवू गावडे, अणसूर पाल हायस्कूल मुख्याध्यापक राजेश घाटवळ, शिक्षिका अक्षता पेडणेकर, चारुता परब व शालेय परीवार, पालक - ग्रामस्थ, माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.