हिंद महासागरात २५०० कीलोहून अधिक ड्रग्ज जप्त

नवी दिल्ली
भारतीय नौदलाच्या आयएनएस तर्कशच्या युद्धनौकेने पश्चिम हिंद महासागरात एक मोठी कारवाई करत 2,500 किलोपेक्षा जास्त अमली पदार्थ जप्त केले आहेत. प्रादेशिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. गस्त घालत असताना आयएनएस तर्कशला भारतीय नौदलाच्या 'पीआय' विमानाकडून परिसरात संशयास्पद जहाजे कार्यरत असल्याबद्दल गुप्तचर सूचना मिळाल्या. सदर जहाजे ड्रग्ज तस्करीसह बेकायदेशीर कामांमध्ये सहभागी होती. या इशाऱ्याला प्रतिसाद देत 'आयएनएस तर्कश'ने जहाजांना अडवण्यासाठी आपला मार्ग बदलत अमली पदार्थ जप्तीची कारवाई केली.सर्व संशयास्पद जहाजांची कसून चौकशी केल्यानंतर पी४आय आणि मुंबई येथील सागरी ऑपरेशन्स सेंटर यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आयएनएस तर्कशने योग्यपणे पावले उचलली. संशयास्पद जहाजाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्या परिसरात कार्यरत असलेल्या इतर जहाजांची ओळख पटविण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारेही नजर ठेवण्यात आली होती. शोध घेण्यासाठी मरीन कमांडोसह एक विशेषज्ञ बोर्डिंग टीम संशयित जहाजावर चढली. छाप्यादरम्यान त्यांना अनेक सीलबंद पाकिटे सापडली. शोध आणि चौकशी दरम्यान, जहाजावरील विविध मालवाहू होल्ड आणि कप्प्यांमधून 2,386 किलो चरस आणि 121 किलो हेरॉइन जप्त करण्यात आले. यानंतर, आयएनएस तर्कशने संशयास्पद जहाज ताब्यात घेत या भागात तस्करीमध्ये आणखी कोणती जहाजे सहभागी आहेत हे शोधण्यासाठी कर्मचाऱ्यांची सविस्तर चौकशी केली.जानेवारी 2025 पासून सागरी सुरक्षा मोहिमेअंतर्गत आयएनएस तर्कश पश्चिम हिंद महासागरात तैनात आहे. 31 मार्च 2025 रोजी गस्त घालत असताना नौदलाच्या पी8आय गस्ती विमानाने समुद्रात काही संशयास्पद जहाजे आढळल्याची माहिती दिली. या बोटी ड्रग्ज तस्करीत सहभागी होत्या असे मानले जात होते.आयएनएस तर्कशने तात्काळ कारवाई करत त्या जहाजांकडे वाटचाल सुरू केली. अनेक संशयास्पद बोटींची चौकशी केल्यानंतर नौदलाने एका बोटीला थांबवून तिची झडती घेतली. यावेळी हेलिकॉप्टरमधूनही पाळत ठेवण्यात आली. ही कारवाई सागरी गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि प्रादेशिक सुरक्षेला चालना देण्यासाठी भारतीय नौदलाच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते.