कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा महायुती पदवीधर निवडणूक आढावा बैठक संपन्न. महायुतीकडून पदवीधर मतदार संघाचे उमेदवार निरंजन डावखरे.

कुडाळ.
महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे आज सिंधुदुर्ग जिल्हा महायुती पदवीधर निवडणूक आढावा बैठक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे सर्व पदाधिकारी व पदवीधर मतदार उपस्थित होते. यांना नारायण राणे त्यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले तसेच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निरंजन डावखरे हे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार असतील असे नारायण राणे यांनी घोषित केले.
यावेळी दहावी परीक्षेमध्ये १०० टक्के गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम आलेली कु.सौजन्या संजय घाटकर हिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब, सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष अबिद नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, सुरेश गवस, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, रंजित देसाई, शिवसेना जिल्हाध्यक्षा सौ.वर्षा कुडाळकर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.