राज्य कॅरम स्पर्धेत ओरोस डॉन बॉस्को हायस्कूल च्या दिव्या राणे चे यश.

राज्य कॅरम स्पर्धेत ओरोस डॉन बॉस्को हायस्कूल च्या दिव्या राणे चे यश.

कणकवली. 

   12 वर्षांखालील मुलींची महाराष्ट्र राज्य कॅरम स्पर्धा मुंबई-दादर येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातुन 14 स्पर्धक सहभागी झाले होते.मुंबई,जळगाव,सोलापुर,सिंधुदुर्ग,रत्नागिरी, ठाणे,पुणे,पालघर आदी जिल्ह्यातुन स्पर्धक आले होते.यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉन बॉस्को हायस्कूल ओरोस येथील इयत्ता चौथीत शिकत असणारी दिव्या दिलीप राणे हिचा तिसरा क्रमांक आला आहे. दिव्या हि कणकवलीत राहत असून युवक कल्याण पतसंस्थेचे मॅनेजर दिलीप राणे यांची मुलगी व ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे यांची पुतणी आहे. राणे कुटुंबात कॅरम चा रस असणारे अनेक जण असताना दिव्या ने देखील त्यांच्या पावलांवर पाऊल टाकले असे म्हटले जाते.राज्य कॅरम स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल दिव्याचे ओसरगाव पंचक्रोशीसह जिल्ह्यातुन देखील कौतुक होत आहे.