माजगाव चे ग्रामदैवत श्री देवी सातेरी चा वार्षिक जत्रोत्सव २६ रोजी.

माजगाव चे ग्रामदैवत श्री देवी सातेरी चा वार्षिक जत्रोत्सव २६ रोजी.

सावंतवाडी.

   जागृत देवस्थान तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले माजगावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी २६ जानेवारी रोजी होत आहे. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणीची पाठीराखी अशी सातेरीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते.
   यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर सातेरी देवीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. या उत्सवासाठी सकाळी म्हालटकर देवघराकडून पालखी व अब्दागीर, घाडी मानकऱ्यांकडून तरंगकाठी, चौगुले नानकत्यांकडून सातेरीची उत्सव मूर्ती तर महादेव मंदिराकडून महादेवाची उत्सव मूर्ती सवाद्य मिरवणूकीने सातेरी मंदिरात आणण्यात येणार आहे. त्यानंतर देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे रात्री संवाद्य पालखी मिरवणूकीनंतर उशिरा पार्सेकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे.लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे मानकरी तसेच ग्राम देवस्थान निधी कमिटीचे अध्यक्ष आनंद सावंत, सचिव विजय माधव आणि माजगाव ग्रामस्थांनी केले आहे.