कनेडी येथील आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

कनेडी येथील आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

कणकवली.

   युवा संदेश प्रतिष्ठान पुरस्कृत व भाजप नाटळ, सांगवे, हरकुळ खुर्द जि. प. मतदार संघा विभागातर्फे कनेडी बाजारपेठ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
   या शिबिराचे उद्घाटन माजी जि. प. अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व माजी जि.प.अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.विद्याधर तायशेटे, विवेकानंद नेत्रालयाचे डॉ. आचरेकर डॉ. प्रियांका जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी डॉ. विजय पगारे,डॉ. गुरुदास मुरकुटे, डॉ.अनुजा भोसले, डॉ. चोडणकर, सांगवे सरपंच बाबू सावंत, उपसरपंच अभिजीत काणेकर, माजी सरपंच विजय भोगटे, दिगवळे सरपंच संतोष घाडीगावकर, उपसरपंच तुषार गावडे, नाटळ सरपंच सुनील घाडीगावकर, करंजे सरपंच सपना मेस्त्री, गांधीनगरचे सरपंच मंगेश बोभाटे, नरडवे सरपंच बाबू सावंत, सांगवे तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप सावंत, करुळ सरपंच समृद्धी नर, कोंडये सरपंच ऋतुराज तेंडुलकर, ग्रामपंचायत सदस्य राजेश सापळे, राजू पेडणेकर, सुभाष सावंत, मयुरी मुंज, राजश्री पवार, स्मिता मालडीकर, महेश खादारे आदी उपस्थित होते.
    आरोग्य तपासणी शिबिरांतर्गत मोतीबिंदू, हर्निया व अपेंडीक्स, महिलांची गर्भपिशवी तपासणी करण्यात आली. यात १२० मोतीबिंदूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यांची ऑपरेशन स्वामी विवेकानंद नेत्रालय मोफत करण्यात येणार आहेत. २५० लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. हर्निया व अपेंडीस्कच्या १५ रुग्णांचे ऑपरेशन संदेश उर्फ गोट्या सावंत व संजना सावंत यांच्या माध्यमातून केले जाणार आहे.