रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची बदली

रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष व लोकप्रिय पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची अप्पर पोलीस आयुक्त विशेष शाखा मुंबई येथे बदली झाली असून त्यांना त्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले आहेत. श्री. कुलकर्णी यांनी रत्नागिरी सोबत आपलेपणाचे नाते जोडले. त्यांच्याच नेतृत्वाखाली लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शांततेत पार पडल्या. केवळ ड्युटी म्हणूनच नव्हे तर रत्नागिरीतील सामान्य नागरीकांशीही त्यांचे उत्तम नाते होते.