तुळस मध्ये आढळला नीम विषारी फोस्ट्रेन कॅट स्नेक.

तुळस मध्ये आढळला नीम विषारी फोस्ट्रेन कॅट स्नेक.

वेंगुर्ला.

   येथील तुळस राऊळवाडी येथे विवेक तिरोडकर यांच्या घराच्या गच्चीवर साप दिसला असता तात्काळ त्यांनी सर्पमित्र महेश राऊळ यांना संपर्क साधला.राऊळ तात्काळ त्या ठिकाणी येऊन त्यांनी 'फोस्ट्रेन कॅट स्नेक' जातीच्या सापाला  पकडुन नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.'फोस्ट्रेन कॅट स्नेक' हा साप निशाचर असून तो झाडावर राहतो. त्यामुळे हा साप  जमिनीवर क्वचितच  आढळून येतो. त्यामुळे आपल्याकडे तो दुर्मिळ साप समजला जातो.  हा साप आढळून आल्यामुळे पुन्हा एकदा आपल्या परिसरात अनेक दुर्मिळ सापांचे अधिवास आहे असे मत सर्पमित्र श्री महेश राऊळ यांनी व्यक्त केले.

'फोस्ट्रेन कॅट स्नेक' ची माहिती पुढील प्रमाणे

‘ फोस्ट्रेन कॅट स्नेक’ हा साप शरीराच्या मानाने लांब असतो. निशाचर असलेला हा साप भारतात बहुतेक जंगलात आढळतो. फॉस्टट्रेन मांजऱ्या हा निमविषारी साप आहे त्याची सरासरी लांबी २०० सेमी,कमाल २३०सेमी. एवढी असते अंगावर तपकिरी किंवा राखाडी रंगाच्या एक आड एक चौकोनाचे नक्षी किंवा आडवे पट्टे असतात. डोक्यावर एक गडद काळी तसेच डोळ्या मागे मानेपर्यंत एक काळी रेष असते रुंद त्रिकोणी डोक्यापासून मान वेगळी दिसते. शरीरापासून बाहेर दिसणाऱ्या मोठ्या तपकिरी रंगाच्या डोळ्यांना उभ्या पुतळ्या असतात. शरीर पातळ आणि नंतरचे संकुचित स्केल असलेल्या लांब आकाराचे गुळगुळीत असते. काळ्या, गडद तपकिरी आणि पांढऱ्या झिगझॅगच्या चिन्हे असलेले डोर्सल रंग तपकिरी-रंग असलेला. याची शेपूट लांब आणि पातळ असते, श्रीलंका भारत (सिक्किम, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, केरल, उत्तर प्रदेश से बिहार, मध्य प्रदेश, उड़ीसा, आंध्र प्रदेश, तमिलनाडु, दक्षिणी राजस्थान, उत्तराखंड और झारखंड) मध्ये आढळतो. बोईगा फोर्स्टेनी ही कोलुब्रिडे कुटुंबातील प्रजाती आहे. लैंगिकदृष्ट्या परिपक्व मादी ५-१० अंडी घालतात. भारतात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अंडी घातली जातात.
  आपल्याकडे भरपूर जैवविविधता  असल्यामुळे अनेक प्रकारचे दुर्मिळ साप आढळून येऊ शकतात. त्यामुळे सर्पमित्र महेश राऊळ यांनी सर्वांना असं आवाहन केल आहे की तुमच्या घरी छोटा असो किंवा मोठा एखादा साप आल्यास त्याला न मारता जवळच्या सर्पमित्रांना बोलवून त्याला सुरक्षित पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात  सोडण्यात यावे.