मुंबईतून आज रात्री कोकणात निघणाऱ्या प्रवाशांसाठी कोकणकन्या, तुतारी पाठोपाठ विशेष गाडी धावणार.

मुंबईतून आज रात्री कोकणात निघणाऱ्या प्रवाशांसाठी कोकणकन्या, तुतारी पाठोपाठ विशेष गाडी धावणार.

रत्नागिरी.

  मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी अशी विशेष रेल्वे गाडी शनिवार दि. २२ जून २०२४ रोजी धावणार आहे. कोकणकन्या तसेच तुतारी एक्सप्रेसमध्ये कन्फर्म तिकीट ना मिळालेल्या प्रवाशांसाठी ही गाडी फायदेशीर ठरणार आहे. आज शुक्रवारी रात्री प्रवासाला निघणाऱ्याना ही गाडी 12 वाजून 20 मिनिटांनी सीएसटी जंक्शनला तर दादरला रात्री बारा वाजून 32 मिनिटांनी पकडता येईल. ठाणे स्थानकात ही गाडी रात्री एक वाजून वीस मिनिटांनी येईल.
  मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही गाडी (01171) ( 21 जूनच्या मध्यरात्रीनंतर ) दिनांक 22 जून रोजी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि तशनिवारी ती सिंधुदुर्गात सावंतवाडी टर्मिनसला ती दुपारी २ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल.
   परतीच्या प्रवासात ही विशेष गाडी (01172) सावंतवाडी येथून शनिवार दि. २२ जून रोजी दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी दि. २३ रोजी ती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पहाटे चार वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल.एकूण १८ डब्यांच्या या विशेष गाडीला सहा डबे सर्वसाधारण श्रेणीतील ( जनरल) तर उर्वरित वातानुकूलित+एस एल आर चे असतील.

या स्थानकांवर थांबणार विशेष गाडी-

दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

   आय आर सी टी सी या रेल्वेच्या अधिकृत आरक्षण प्रणालीनुसार दादर नंतर या गाडीचे थांबे तुतारी एक्सप्रेस प्रमाणेच आहेत. मुंबईतून कोकणात प्रवासासाठी निघताना कोकणकन्या तसेच तुतारी एक्सप्रेस एक्सप्रेसचे कन्फर्म तिकीट नसलेल्या प्रवाशांसाठी ही गाडी फायदेशीर ठरणार आहे. या गाडीला जनरलचे सहा डबे जोडण्यात येणार आहेत.