एलॉन मस्क यांच्या आईने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

एलॉन मस्क यांच्या आईने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

 

मुंबई 

 

        प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर हे केवळ मुंबईकरांचे नव्हे तर परदेशी पाहुण्यांचेही श्रद्धास्थान बनले असून, अनेक सेलिब्रिटी आणि परदेशी पाहुणे या मंदिराला भेट देतात. जगप्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या मातोश्रींनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले आहे. श्रद्धेने भरलेल्या वातावरणात त्यांचे मंदिरात आगमन झाले आणि उपस्थित भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलॉन मस्क यांच्याबाबत जगभरात कुतूहल असताना, त्यांच्या आईने भारतात येऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेणे हे विशेषच ठरले. मंदिर प्रांगणात दोघींनीही काही काळ शांतपणे पूजा केली आणि मंदिर व्यवस्थापनाशी सौजन्यपूर्वक संवाद साधला.टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांच्या आई माये मस्क सध्या मुंबईत आहेत. गेल्या आठवड्याभरापासून ७७ वर्षीय माये मस्क मुंबईतच मुक्कामी असून त्यांचा यंदाचा वाढदिवसदेखील त्यांनी मुंबईतच साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त एलॉन मस्क यांनी आईसाठी फुले पाठवल्याचा फोटो माये मस्क यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर माये मस्क यांचे सिद्धिविनायक मंदिरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये त्यांच्यासमवेत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसदेखील दिसत आहे.माये मस्क यांनी 'ए वुमन मेक्स अ प्लान' हे पुस्तक लिहिल असून त्या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यासाठी त्या मुंबईत दाखल झाल्या आहेत. त्यांच्याच हस्ते त्यांच्या पुस्तकाच प्रकाशन करण्यात आल. यानंतर त्यांनी 'राजकमल बुक्स'ला टॅग करून पुस्तकांसोबत एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी पुस्तकाची हिंदी आवृत्ती भाषांतरीत करून प्रकाशित केल्याबद्दल राजकमल बुक्सचे आभार मानले आहेत. दरम्यान, जेव्हा विज्ञानविश्वातील एका दिग्गजाच्या मातोश्रींनी भारताच्या अध्यात्मिक परंपरेला नमन करत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले, तेव्हा उपस्थित भाविकांसाठी हा एक अप्रतिम क्षण ठरला.