उभादांडा मंदिर गणेशमूर्तीचे २६ रोजी विसर्जन

उभादांडा मंदिर गणेशमूर्तीचे २६ रोजी विसर्जन

 

वेंगुर्ला


       उभादांडा येथील प्रसिद्ध श्री गणपती मंदिरातील गणेश मूर्ती विसर्जनाच्या निमित्ताने बुधवार, २५ फेबुवारी रोजी दुपारी १.३० वा. महाप्रसाद 'म्हामणे', गुरूवार २६ रोजी मूर्तीविसर्जन करण्यात येणार आहे. उभादांडा गावासह वेंगुर्ले शहर व दूरदूरचे असंख्य भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. यावर्षी हा म्हामण्याचा कार्यक्रम २५ फेबुवारी रोजी होणार आहे. २६ रोजी सायं. ६.३० वा. गणपती मंदिर देवस्थान येथे भजन, आरती झाल्यानंतर श्री स्वयंभू सागरेश्वर मंदिरपर्यंत किनारी ढोल-ताशांच्या व भजनाच्या गजरात 'श्रीं'च्या मूर्तीचे सागरकिनारी विसर्जन होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गणपती मंदिर देवस्थान उभादांडा, वाघेश्वरवाडी समितीच्यावतीने केले आहे.