वेंगुर्ला शिरोडा येथे ८ फेब्रुवारी रोजी खर्डाची जत्रा

वेंगुर्ला  शिरोडा येथे ८ फेब्रुवारी रोजी  खर्डाची जत्रा

वेंगुर्ला 


          वेंगुर्ला येथील शिरोडा-बागयतवाडी येथे खर्डाची जत्रा माघ शुक्ल एकादशी शनिवार दि. ८ फेब्रुवारीला संपन्न होणार आहे.तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ७ वा. विधी श्री देवी चरणी लघुरुद्र धार्मिक, सायं. ७ वा. दिपोत्सव, रात्रौ ८ वा. ग्रामस्थांचे  भजन आणि रात्रौ १० वा. मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा पौराणिक दणदणीत दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व नाट्यरसिकांनी नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव जागनाथ देवस्थान, शिरोडा-बागयतवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.