छावा सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजीनगरमध्ये

छावा सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजीनगरमध्ये


संभाजीनगर 


           लक्ष्मण उतेकर  दिग्दर्शित 'छावा' या हिंदी सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. सिनेमात अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराजांची आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भुमिका साकारली आहे. छावा' सिनेमाचा टीझर, ट्रेलरनंतर आता प्रत्यक्ष सिनेमा पाहायला लोक उत्सुक आहेत. सध्या विकी कौशल 'छावा'च्या प्रमोशनसाठी सगळीकडे फिरतोय.सिनेमाच्या प्रमोशनसाठी विकी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहचला. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहचण्याआधी विकीन घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच दर्शन घेतल. याबद्दल तो म्हणाला, "ऐतिहासिक शहरात येण्याआधी मी वेरूळ घृष्णेश्वरला जाऊन ज्योतिर्लिंगचे दर्शन घेतले. मी या भागातच पहिल्यांदा आलो, ज्योतिर्लिंगाचे दर्शनही पहिल्यांदा घेतले. हा परिसर देखील खूप सुंदर आणि समृद्ध आहे". यासोबतच तो म्हणाला, "मी आज सकाळी छत्रपती संभाजी नगर शहरात आलो. ज्यांच्या नावावर हे शहर आहे. त्यांच्या वडिलांचा अर्थात शिवरायांचा पुतळा मी क्रांती चौकात पाहिला, तो पाहून तिथेच बसून राहावे, असे वाटले. फार सुंदर हा परिसर आहे", या शब्दात विकीन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच कौतुक केल.
         'छावा' सिनेमाच्या शुटिंगबद्दल बोलताना तो म्हणाला, "सिनेमाची भव्यदिव्यता,त्याचे बॅकग्राऊंड म्युझिक, गाण्यासाठी असलेले ज्येष्ठ संगीतकार ए.आर. रहमान यांचे संगीत या जमेच्या बाजू आहेत. उतेकर यांनी फार बारकाईने अभ्यास करत हा सिनेमा बनवला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात जिथे जिथे महारांजाचे पाय लागलेत. रायगड असो किंवा इतर किल्ले असो. प्रत्येक ठिकाणी जाऊन संपुर्ण माहिती गोळा करण्यात आली. अभ्यास करण्यात आला. सिनेमाचा सेट अगदी जशास तसा बनवण्यात आलाय. सिनेमात परिधान करण्यात आलेले कपडे लोकल कारागिरांकडून बनवण्यात आले आहेत, दागिने बनवण्यात आले. यासाठी पुर्ण एक वर्ष लागल. पुढची ३५० वर्ष लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे, असा एक भव्य चित्रपट बनवण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. राजेंच वैभव तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळेल. संपुर्ण जगाला कळाल पाहिजे की आपला राजा कसा होता. यासाठी आम्ही सर्वांनी मेहनत घेतलीय, अस विकी म्हणाला.