परुळेत २८ जानेवारी रोजी हाफ मॅरेथॉन चे आयोजन.

परुळेत २८ जानेवारी रोजी हाफ मॅरेथॉन चे आयोजन.

वेंगुर्ला.

  सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत असणा-या राधारंग फाउंडेशनने दरवर्षी प्रमाणे  यावर्षी रविवार दि.२८ जानेवारी २०२४ रोजी मॅरेथॉनचे आयोजन केले आहे.यंदाचे हे तिसरे वर्ष असून यावर्षी ५,१० आणि २१ किमी च्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनमध्ये कोणत्याही वयोगटाचे स्त्री पुरुष सहभागी होऊ शकतात.यात नावनोंदणी करुन सहभागी होणा-यांना टि शर्ट देण्यात येणार असून निवडलेले अंतर पूर्ण करणा-यांना मेडल्स देण्यात येणार आहेत. सर्व सहभागींना मॅरेथॉन दरम्यान पाणी, ओआरएस, फळे, अल्पोपहार, वैद्यकीय मदत देण्यात येणार असून प्रशिक्षित स्टाफसह दोन अँब्युलन्स उपलब्ध असणार आहेत. तसेच ज्यांना गरज असेल त्यांच्यासाठी फिजीओथेरपीची सेवा उपलब्ध असणार आहे. ही मॕरॕथाॕन परुळे हायस्कुल येथून सुरु होऊन विमानतळ मार्गे देवली पूल आणि तिथुन परत अशी होणार आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी ५ व १० किमीसाठी रु.१०० तर २१ किमीसाठी रु.२०० प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे.यात सहभागी होणा-यांनी दि १२ जानेवारी पूर्वी सिद्धेश तेली (9768840659) यांच्याकडे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.विहीत कालावधीत प्रवेश फी भरुन नोंदणी करणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल.