सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. नाम. राणे यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे
गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी दुपारी ०१.०० वा. मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण, दुपारी ०१.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व राखीव. दुपारी ०२.०० वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने गोव्याकडे प्रयाण, दुपारी ०३.०० वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, दुपारी ०३.३० वा. बॅरिस्टर नाथ पै यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्ताने बॅरिस्टर नाथ पै कम्युनिटी सेंटरला भेट(स्थळ : बॅरिस्टर नाथ पै कम्युनिटी सेंटर, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग), दुपारी ०४.०० वा. मोटारीने कणकवलीकडे प्रयाण, सायं. ०५.०० वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथे आगमन व राखीव.