शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा बोईसर ते वांद्रे लोकल प्रवास.
मुंबई.
शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पालघरमध्ये प्रचारसभा झाली. ठाकरेंच्या लोकसभेच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी ठाकरे हे बोईसरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. या सभेनंतर उद्धव ठाकरेंनी चक्क लोकलने प्रवास केला आहे.वंदे भारत रेल्वेतून प्रवास केल्यानंतर त्यांच्या लोकल प्रवासाची एकच चर्चा आहे. बोईसर येथील सभेला संबोधित केल्यानंतर उद्धव ठाकरे आपल्या खासगी वाहनाने थेट बोईसर येथील रेल्वे स्थानकावर पोहचले. ठाकरे रेल्वे स्थानकावर पोहचताच त्यांच्या समर्थकांनी एकच तोबा गर्दी केली. कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकावर जोरदजार घोषणाबाजी केली. यावेळी ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत आणि त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे ठाकरेंना विंडोसीटवर बसले आणि त्यांच्या शेजारी संजय राऊत होते. ठाकरेंच्या लोकलवारीची आता एकच चर्चा आहे.
फेब्रुवारीत उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा पार पडला होता. यावेळी कोकणातील 'जनसंवाद यात्रा' संपवून ठाकरे यांनी सपत्नीक कोकणातील खेड ते मुंबई दरम्यान वंदे भारत या रेल्वेने प्रवास केला होता. यानंतर त्यांनी आज पुन्हा एकदा रेल्वे लोकलमधूम प्रवास केला आहे.