पिकुळे गावातील महिलांचा ग्रामोद्योग वाढण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण दौरा.
सिंधुदुर्ग.
कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत पिकुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील महिलांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याअंतर्गत कृषी अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
या अभ्यास सहलीला एकूण १२३ महिलांनी सहभाग घेतला होता.या कृषी अभ्यास सहली दरम्यान बंदिस्त शेळीपालन प्रकल्प, काथ्या प्रकल्प ज्यात काथ्यापासून विविध वस्तू बनविणे, कृषी रोपवाटिका अशा अनेक प्रकल्पांची प्रत्यक्ष भेटीद्वारे माहिती घेण्यात आली.
काथाप्रक्रिया संस्था तुळस येथे सोडणापासून काथा व कोको पावडर कशी बनवतात याचे कृती सहित मार्गदर्शन त्याच बरोबर प्रमिला कॉयर रोप प्रकल्पाला भेट देऊन व्यावसायिक माहिती घेण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पिकुळे गावचे सरपंच आप्पा वसंत गवस, उपसरंचप,ग्रामपंचायत सदस्य,पत्रकार रत्नदिप गवस यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर प्रकल्प व्यवस्थापक श्री. प्रथमेश सावंत, श्री. हनुमंत गवस, श्री.शशिकांत कासले यांनी सहलीचे यशस्वीरीत्या नियोजन केले.