प्रजासत्‍ताक दिनानिमित्त वेंगुर्ले नगर परिषद तर्फे सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान

प्रजासत्‍ताक दिनानिमित्त वेंगुर्ले नगर परिषद तर्फे सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान


       वेंगुर्ला नगरपरिषदेमध्‍ये ७६ वा भारतीय प्रजासत्‍ताक दिन मोठ्या उत्‍साहाने साजरा करण्‍यात आला. यानिमित्‍त वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या क्रॉफर्ड मार्केट (जुनी प्रशासकीय इमारत) येथे नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी श्री.परितोष कंकाळ यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा वेंगुर्ला नगरपरिषदेचे माजी नगराध्‍यक्ष श्री. दिलीप गिरप, सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री सचिन वालावलकर, माझी नगरसेवक  श्री. उमेश येरम, सामाजिक कार्यकर्ते श्री. नंदन वेंगुर्लेकर, माजी  सैनिकांचे कुटुंबीय श्री. विलास पडवळ व श्री. प्रथमेश गुरव,   तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
     ध्‍वजारोहणा नंतर वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृ्हामध्‍ये मान्‍यवरांच्‍या हस्‍ते  उत्‍कृष्‍ट काम करणा-या सफाई कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र, गुलाब पुष्प व भेट वस्तू  देऊन गौरविण्यात आले. तसेच, वेंगुर्ला शहराला स्वच्छ, सुंदर व हरित बनवण्यासाठी आपल्या सहभागातून व सहकार्यातून मोलाचे योगदान देणाऱ्या 'माझा वेंगुर्ला' या संस्थेला वेंगुर्ला नगरपरिषदेचे स्वच्छता दूत ( ब्रँड अँबेसॅडर) म्हणून सन्मानित करण्यात आले पर्यावरणपूरक उपक्रम, विविध जनजागृती कार्यक्रम आणि विविध स्वच्छता अभियानांमध्ये संस्थेने घेतलेला पुढाकार व सहभाग हे शहराच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. तसेच माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेच्या विविध अभियानांमध्ये आणि उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या डॉ. धनश्री सागर पाटील यांना पर्यावरण दूत म्हणून सन्मानित करण्यात आले. वेंगुर्ला शहराला कचरामुक्त बनवण्यासाठी नियमित सहकार्य करणाऱ्या नागरिकांचा "स्वच्छता चॅम्पियन" म्हणून सन्मान करण्यात आला. यामध्ये स्वामिनी स्वयंसहायता महिला बचत गट, सखी स्वयंसहायता महिला बचत गट, श्रीम. लीना शामसुंदर नाईक, श्री. प्रीतीश लाड, श्री. वासुदेव खडपकर व लेफ्टनंट बाळासाहेब गायकवाड यांचा समावेश होता.तसेच माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शहरातील  वृक्ष गणना, भूस्थानीकीकरण व हरित परीक्षण या कामामध्ये सहभागी झालेल्या खर्डेकर महाविद्यालयाच्या विध्यार्थिनी श्रीम. प्रिती दिलीप वाडकर, श्रीम. चैतन्या जितेंद्र लाड, श्रीम. रुपाली राजेंद्र जाधव यांचा सत्कार करण्यात आला.  यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्‍यक्त करुन नगरपरिषदेच्‍या कामाचे कौतुक करून पुढील  वाटचालीसाठी शुभेच्‍छा दिल्या. वेंगुर्ला नगरपरिषदेचे सर्व अधिकारी/कर्मचारी व सफाई कर्मचारी यांच्‍या अथक परिश्रमामुळे वेंगुर्ला नगरपरिषदेचे नांव राज्‍यात  तसेच देश पातळीवर झळकत आहे. राज्‍यातील सर्वात जुन्‍या नगरपरिषदांपैकी एक असणा-या  वेंगुर्ला नगरपरिषदेस  विविध क्षेत्रात अनेक पुरस्‍कार प्राप्‍त झालेले आहेत. सफाई कर्मचा-यांचे अमूल्‍य योगदान विचारात घेवून त्‍यांच्‍यासाठी नगरपरिषदेमार्फत विविध लाभदायी योजना लागू करण्‍यात आलेल्या आहेत.  आगामी काळात वेंगुर्ला नगरपरिषदेस १५० वर्षे पूर्ण होणार असून त्‍यानिमित्‍त यापेक्षा उज्‍वल यश प्राप्‍त करुन देण्‍यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करुन  वेंगुर्ला नगरपरिषदेचे नाव उज्‍वल करु असे मनोगत मुख्‍याधिकारी श्री.परितोष कंकाळ यांनी व्‍यक्त केले. तद्नंतर वेंगुर्ला शहराचा मुख्‍य जलस्‍त्रोत निशाण तलाव (अमृत सरोवर) येथे माजी  सैनिकांचे कुटुंबीय श्री. विलास पडवळ यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. याप्रसंगी वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.