मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेची देवगड तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी करणार. भाजपा जिल्हा उपाध्यक्षा प्रियांका साळसकर यांची माहिती.

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेची देवगड तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी करणार.  भाजपा जिल्हा उपाध्यक्षा प्रियांका साळसकर यांची माहिती.

देवगड.

   अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थ -संकल्पामध्ये महिला भगिनींसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणि सवलती जाहीर करण्यात आलेल्या आहेत.यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत यांसह ज्या यंत्रणांमार्फत ही योजना राबविण्यात येणार, त्या यंत्रणांना भाजपा पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य करून या योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याची माहिती भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर यांनी दिली.त्या जामसंडे येथील भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
    यावेळी पडेल मंडल महिला मोर्चा अध्यक्षा संजना आळवे, नगरसेविका सौ.तन्वी चांदोस्कर, सौ स्वरा कावले,
सौ ऋचाली पाटकर, सौ.आद्या गुमास्ते, सौ प्राजक्ता घाडी, सौ तन्वी शिंदे, सौ.श्वेता शिवलकर, लता गिरकर, रेश्मा चव्हाण, उल्हास मणचेकर आदी उपस्थित होते.
    त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांचे आभार मानत असल्याची माहिती भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर यांनी दिली.
    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी सर्वात महत्त्वाची योजना म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केली. या योजनेमध्ये पात्र महिलांना दर महिन्याला १५००/- रुपये देण्यात येणार आणि या योजनेसाठी सरकारकडून ४६००० कोटी रुपयांचा निधीची भरीव  तरतूद उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.या योजनेच्या माध्यमातून महिलांना  फायदा होईल.त्याचबरोबर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत दिले जातील.
   राज्यातील दहा हजार महिलांना पिंक रिक्षा खरेदीसाठी सरकारकडून निधी सुद्धा उपलब्ध करून दिला. महाराष्ट्रामध्ये सहा लाखाहून अधिक महिला बचत गट कार्यरत असून त्यांची संख्या सात लाखांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. महिला उद्योजकांसाठी १५ लाख रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुद्धा सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितले. महिला व बालकांविरोधातील अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी १०० विशेष जलद गती न्यायालयांना आवश्यक निधी सुद्धा उपलब्ध करून दिला जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ करण्याची घोषणा सरकारने केलेली आहे.यासाठी महत्त्वाचा पाठपुरावा आमदार नितेश राणे यांनी केला आमदार नितेश राणे व सरकारचेही त्यांनी  विशेष आभार मानले.