आडेली गवळीवाडी येथे म्हैशीच्या अंगावर विद्युतभार वाहीनी पडुन म्हैस मृत्युमुखी. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी म्हैस मालकाला केली तातडीने मदत.

आडेली गवळीवाडी येथे म्हैशीच्या अंगावर विद्युतभार वाहीनी पडुन म्हैस मृत्युमुखी.  भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी म्हैस मालकाला केली तातडीने मदत.

वेंगुर्ला.

   तालुक्यातील आडेली - गवळीवाडी येथे रहाणारे गवळी  श्री.प्रशांत मनोहर गवळी यांच्या एका म्हैशीवर विद्युतभार वाहिनी पडुन मृत्युमुखी पडली व एक म्हैस गंभीर जखमी झाली. त्यामुळेच गोरगरीब शेतकऱ्यावर आभाळ कोसळले. गेली ४५ वर्षे परंपरागत दुधविक्री व्यवसाय करणारे गवळी कुटुंब फार खचुन गेले.सदर घटना भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या निर्दशनास आणल्यावर ताबडतोब आडेली - गवळिवाडी येथे जात प्रशांत मनोहर गवळी यांची भेट घेऊन तात्काळ रोख स्वरूपात मदत केली. तसेच पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कडे पाठपुरावा करुन शासनस्तरावर जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल असे अभिवचन दिले.
  यावेळी आडेली गावच्या सरपंचा सौ.यशस्वी कोंडसकर यांच्या हस्ते रोख रक्कम प्रशांत गवळी यांना सुपूर्द करण्यात आली.
   यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, कुडाळ युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, तेर्सेबांबार्डे ग्रामपंचायत सरपंच रामचंद्र परब, आडेली शक्तिकेंद्र प्रमुख तात्या कोंडसकर, तेर्सेबांबार्डे शक्तिकेंद्र प्रमुख अजय डिचोलकर, मा.पोलीस पाटील पांडुरंग आडेलकर, राजु सामंत, ग्रा.पं.सदस्य महेंद्र मेस्त्री, प्रकाश साटेलकर, राजेश गवळी, दत्ताराम गवळी तसेच आडेली - गवळीवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.