तिलारी घाटात मालवाहतूक करणारा ट्रक उलटला.

तिलारी घाटात  मालवाहतूक करणारा ट्रक उलटला.

 

दोडामार्ग

 

      तिलारी घाटातील जयकर पॉईंट येथे मालवाहतूक करणारा ट्रक उलटला. या अपघातात मालासह गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने चालक व वाहक सुखरूप आहेत. कोल्हापूरहून येणारा हा कांदा घेऊन गोव्याला जाण्यासाठी तिलारी घाटमार्गे येत होता. दुपारच्या सुमारास तिलारी घाट उतरत असताना जयकर पॉईंट येथील तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक पलटी झाला. यावेळी ट्रकमधील काही कांदे इतरत्र पसरले. तरी तो खोल दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावला. चालक व वाहक हे किरकोळ जखमी झाले असून मालासह ट्रकचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.