ओसरगाव येथील तन्वी कदम हिचे सनदी लेखापाल परीक्षेत यश.

ओसरगाव येथील तन्वी कदम हिचे सनदी लेखापाल परीक्षेत यश.


     ओसरगावातील रहिवासी असलेले संतोष कदम यांची कन्या तन्वी हिने देशातील सर्वात कठीण समजली जाणारी तसेच प्रतिष्ठित सनदी लेखापाल परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होत यश संपादन केले. तिच्या यशामुळे ओसरगावची छाती अभिमानाने फुलली आहे. व सर्वत्र ओसरगावचा नावलौकिक होत आहे.
   तन्वीच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन व कौतुक होत आहे. शासकीय स्तरावरील अधिकाऱ्यांकडून तिचा गौरव करण्यात आला आहे. तसेच ओसरगावातील ग्रामस्थांनी तन्वीच्या घरी भेट देऊन तिचा सन्मान करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.