वंदे भारत स्लिपरची ट्रायल रन येत्या १५ ऑगस्ट पासून?
नवीदिल्ली.
वंदे भारत ट्रेननंतर रेल्वे प्रशासनाने वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची योजना आखली आहे. सांगितले जात आहे, १५ ऑगस्ट पासून वंदे भारत स्लीपर रेल्वेचे ट्रायल सुरू केले जाईल.
ट्रायल यशस्वी झाल्यानंतर ही ट्रेन सामान्य प्रवाशांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. आपल्या एका निवेदनात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली होती की, भारतीय रेल्वे २०२९ पर्यंत वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या जवळपास २५० यूनिट चालवण्याच्या योजनेवर काम करत आहे.
रिपोर्ट्सनुसार, दिल्ली-मुंबई, दिल्ली- कोलकाता मार्गावर नव्या वंदे भारत स्लीपर ट्रेन पहिल्या टप्प्यात धावण्याची शक्यता आहे.मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. या ट्रेन भविष्यात राजधानी एक्सप्रेसची जागा घेऊ शकतात. वंदे भारत स्लीपर बोगींचे उत्पादन इंटीग्रल कोच फॅक्ट्री, चेन्नईच्या सहकार्याने बंगळुरूमध्ये भारत अर्थ मूवर्स लिमिटेडच्या युनिटमध्ये केले जात आहे. नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन कमाल १६० किलोमीटर प्रतितास वेगाने धावण्याची शक्यता आहे. याचे बाहेरील डिझाइन जवळपास वंदे भारत एक्सप्रेस सारखेच असल्याचे सांगितले जात आहे. या ट्रेनला एकूण १६ कोच असतील व प्रवाशांच्या आरामदायक व सुविधापूर्ण प्रवासासाठी ८२३ बर्थ असतील. या ट्रेनमध्ये प्रवाशांना विमान प्रवासाच्या धर्तीवर सुविधा प्रदान केल्या जातील. भोजन आणि पेयजल उपलब्ध करण्यासाठी पँट्रीची व्यवस्था असेल. बाहेरच्या बाजुला एक स्वंयचालित दरवाजा, एक दुर्घंधीरहित शौचालय असेल. या ट्रेनचे कोच पूर्णपणे साउंड प्रुफ असतील. प्रवासाच्या दरम्यान प्रवाशांना चांगल्या झोपेसाठी आरामदायक सुविधा दिली जाईल.रेल्वे विभागा द्वारे आसपासच्या शहरांना जोडण्यासाठी वंदे भारत मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. या ट्रेन कानपूर-लखनऊ, दिल्ली-मेरठ, मुंबई-लोणावळा, वाराणसी-प्रयागराज, पुरी-भुवनेश्वर आणि आग्रा-मथुरा दरम्यान संचालित केली जाईल. सांगितले जात आहे की, प्रत्येक कोचमध्ये २५० लोक आरामात बसून प्रवास करू शकतात. रेल्वेकडून लवकरच वंदे भारत मेट्रोचे ट्रायल रन सुरू केले जाईल.