वेंगुर्ला आनंदवाडी येथील रहिवासी नलिनी जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन

वेंगुर्ला आनंदवाडी येथील रहिवासी नलिनी जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन

 

वेंगुर्ला

 

      वेंगुर्ला आनंदवाडी येथील रहिवासी नलिनी राघोबा जाधव (८५) यांचे सोमवार दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.त्यांच्यावर दुपारी ४:०० वाजता अंतिम संस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन सुना, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.दिवाणी न्यायालय वेंगुर्ला येथील सेवानिवृत्त लिपीक जयंत राघोबा जाधव यांच्या त्या आई होत.कालकथित नलिनी राघोबा जाधव यांचा जलदान व पुण्यनुमोदन विधी रविवार दिनांक २८/१२/२०२५ रोजी सकाळी १० वाजता आनंदवाडी येथे त्यांच्या राहत्या घरी करण्यात येणार आहे तरी धम्म बांधव - भगिनी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.