जिल्हास्तरीय 'नाट्यगीत गायन’ स्पर्धेत केतकी सावंत प्रथम.
सावंतवाडी.
क्षितिज इव्हेंट, सावंतवाडीची भव्य जिल्हास्तरीय साभिनय सवेश 'नाट्यगीत गायन स्पर्धा २०२४' ला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला. रविवारी कळसुलकर इंग्लिश स्कूल येथे ही स्पर्धा पार पडली. एकापेक्षा एक अशा साभिनय नाट्यगीत गायनानं स्पर्धकांनी उपस्थितांची मनं जिंकली. यात सावंतवाडीची केतकी सोमा सावंत ही प्रथम क्रमांकांची मानकरी ठरली. मान्यवरांच्या हस्ते तीला सन्मानित करण्यात आलं.
ऐतिहासिक वारसा लाभलेल सावंतवाडी शहर हे महाराष्ट्रात सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. नाट्यक्षेत्रातही सावंतवाडी शहराचे खूप मोठे योगदान आहे. सावंतवाडीत ही नाट्य चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी क्षितिज इव्हेंट संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत आहोत. नवीन कलाकारांना संधी देऊन नाविन्यपूर्ण पद्धतीने विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन या संस्थेच्यावतीने अनेक वर्षे सातत्याने केल जात आहे. रविवारी भव्य जिल्हास्तरीय साभिनय सवेश 'नाट्यगीत गायन स्पर्धा २०२४' ला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला. यामध्ये सद्गुरू संगीत विद्यालय, सावंतवाडीची विद्यार्थिनी केतकी सावंत ही प्रथम क्रमांकांची मानकरी ठरली. द्वितीय क्रमांक प्रिया चिपकर हीन प्राप्त केला. तर तृतीय क्रमांक विदिशा बाक्रे तर शर्वाणी करंबेळकर, अक्षय जांबळे उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी ठरले. सर्व विजेत्यांचे अभिनंदन करत मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. या स्पर्धेत कुडाळ येथील प्रसिद्ध तबला वादक श्री सिद्धेश कुंटे यांनी तबला साथ केली तर देवगड येथील उत्कृष्ठ गायक व ऑर्गन वादक श्री प्रसाद शेवडे यांनी ऑर्गन साथ केली या संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण श्रीपाद चोडणकर व स्वप्नील गोरे यांनी केले.
याप्रसंगी क्षितीज इव्हेंटचे अध्यक्ष बाळ पुराणिक, प्रविण मांजरेकर, नादब्रह्म सावंतवाडीचे अध्यक्ष प्रदीप शेवडे, लक्ष्मण नाईक, सिद्धेश नेरूरकर, गणेश दीक्षित,राजेश जाधव, संदीप धुरी, रामचंद्र मोर्ये आशुतोष चिटणीस, हर्षवर्धन धारणकर, सौ. उमा जडये, गणेशप्रसाद गोगटे, सृष्टी पेडणेकर, संतोष गावडे आदी उपस्थित होते.