कुडाळ तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.१४ टक्के

कुडाळ तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.१४ टक्के

 

कुडाळ

 

      महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेचा कुडाळ तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.१४ टक्के लागला आहे. तालुक्यात प्रथम क्रमांक कुडाळ हायस्कूल कुडाळचा चैतन्या कृपेश सावंत १०० टक्के, द्वितीय क्रमांक स्मितेश विनोद कडोलकर ९९.४० टक्के, तृतीय क्रमांक निधी भास्कर सावंत व रिया राकेश पाटणकर ९९ टक्के यांनी प्राप्त केला. कुडाळ तालुक्यातील ३४ पैकी २७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. तालुक्यातील १ हजार ६४२ पैकी १ हजार ६२८ विद्यार्थी पास झाले आहेत. यामध्ये विशेष श्रेणीत ७३६, प्रथम श्रेणीत ५९०, द्वितीय श्रेणीत २६६ विद्यार्थी पास झाले आहेत.