जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये आरवली दरम्यान बिघाड; आरवली स्थानकात ट्रेनचा तासभर खोळंबा.

जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये आरवली दरम्यान बिघाड; आरवली स्थानकात ट्रेनचा तासभर खोळंबा.

रत्नागिरी.

    कोकण रेल्वे मार्गावर जलद गतीने धावणाऱ्या मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये आरवली दरम्यान बिघाड झाला.यामुळे ही ट्रेन आरवली स्थानकात सुमारे तासभर थांबली होती.
   मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून मडगावला जाणाऱ्या १२०५१ या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनात आरवली दरम्यान बिघाड झाला. ही गाडी मुळात सावर्डेपर्यंत ४० मिनिटे विलंबाने धावत होती. इंजिनातील बिघाडामुळे ती आरवली स्थानकात तासभर थांबवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. दरम्यान, दुसरे इंजिन जोडल्यानंतर ही गाडी मडगावच्या दिशेने मार्गस्थ झाली. पर्यायी इंजिन उपलब्ध झाल्यानंतर सुमारे तासभराने ही गाडी मडगावकडे मार्गस्थ करण्यात आली. या गाडीच्या खोळंब्याने इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर काही परिणाम झाला नाही. ही गाडी एकाच जागी तासभर थांबली असली तरी त्याचा अन्य गाड्यांच्या वेळापत्रकावर काहीही परिणाम झाला नसल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.