मुंबईचे डबेवाले ९ एप्रिलपासून सहा दिवसांच्या रजेवर

मुंबई
मुंबईचे डबेवाले बुधवार दिनांक ९ एप्रिलपासून सहा दिवसांच्या रजेवर चालले आहेत. १४ एप्रिलपर्यंत डबेवाले आपापल्या गावांतील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. १५ एप्रिलपासून ते पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत हजर होतील, अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली. मुंबईत कार्यालयात डबा पोहचवण्याची करामत साध्य करणारे डबेवाले मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यातील आपल्या गावी दरवर्षी जातात. ग्रामदैवत/कुलदैवतांच्या यात्रांत सहभागी होतात. यंदाही ते सहा दिवस या सुट्टीवर आहेत. त्यात महावीर जयंती, हनुमान जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्याने डबेवाल्यांची सुट्टी प्रत्यक्षात दोन दिवसांनीच आहे. ग्राहकांनी या सुटीच्या कालावधीतील डबेवाल्यांचा पगार कापू नये, अशी विनंतीही तळेकर यांनी केली आहे.