संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार वितरण सोहळा.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार वितरण सोहळा.

सिंधुदुर्ग.

  राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2018-19, 2019-20, 2020-21, व 2021-22 या वर्षाचा पुरस्कार वितरण सोहळा संत एकनाथ रंगमंदिर, नवीन उस्मानपुरा, पन्नालाल नगर, छत्रपती संभाजी नगर येथे 23 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.जिल्ह्यातील ग्रामपंचायत बापर्डे, ग्रामपंचायत परुळेबाजार, ग्रामपंचायत निरवडे, यांना या कार्यक्रमाकरीता निमंत्रित करण्यात आले आहे. राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत या ग्रामपंचायतीचे नामाकंन झाले होते. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी दिली आहे.
    संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2018-19,2019-20,2020-21 व 2021-22 यांचा पुरस्कार वितरण कार्यक्रम दि. 23 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता संत एकनाथ रंगमंदिर, नवीन उस्मानपुरा, पन्नालाल नगर, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांत जिल्ह्यातील ग्रामपंचायत बापर्डे, ता. देवगड, ग्रामपंचायत परुळेबाजार ता. वेंगुर्ला, ग्रामपंचायत निरवडे ता. सावंतवाडी यांनी उल्लेखनिय काम केल्याबद्दल त्याचा सन्मान करण्यात येणार आहे. सन 2019-20 मध्ये ग्रामपंचायत बापर्डे व ग्रामपंचायत परुळेबाजार याचे नामाकंन राज्यस्तर स्पर्धेकरीता तर 2020-21,2021-22 या स्पर्धेत ग्रामपंचायत परुळेबाजार व ग्रामपंचायत निरवडे यांना राज्यस्तर स्पर्धेकरीता नामाकंन प्राप्त झाले होते व राज्यस्तरीय समितीच्या माध्यमातून तपासणी पुर्ण करण्यात आली होती.
   या कार्यक्रमांत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर,  बापर्डे ग्रामसेवक शिवराज राठोड, परुळेबाजार ग्रामसेवक शरद शिंदे, यांना ही या कार्यक्रमात अभियान प्रभावी नियोजन, अमंलबजावणी व अभियानात उल्लेखनिय काम केल्याबद्दल सन्मान करण्यात येणार आहे.