खर्डेकर महाविद्यालयात मुंबई विद्यापीठ कोकण झोन ४ पुरुष शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न. शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रणय चोरगे, हेमंत पवार, किशोर म्हापदी, आयुष सुर्वे प्रथम.
वेंगुर्ला.
बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला येथे ४ व ५ जानेवारी २०२४ रोजी मुंबई विद्यापीठ कोकण झोन ४ (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड) पुरुष शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन बॅ.बी.के कॉलेज स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य श्री सुरेंद्र खामंकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व पुढील स्पर्धेत प्राविण्य संपादन करण्यासाठी मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगुले यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.व महाविद्यालयाचे माजी आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव खेळाडू मंगेश गावडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.या स्पर्धेसाठी नॅक कोऑर्डिनेटर श्री.डी.बी.राणे. माजी पंचायत समिती सभापती श्री. जयप्रकाश चमणकर, संस्था प्रतिनिधी श्री. सुरेंद्र चव्हाण, पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रा. चंद्रकांत नाईक व गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीचे डॉ.विनोद शिंदे उपस्थित होते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपतीपुरस्कार विजेते श्री. विजय मोरे, महाराष्ट्र कामगार श्री विजेता श्री किशोर सोन्सुरकर, आंतराराष्ट्रीय पंच रामकृष्ण चितळे या स्पर्धेसाठी पंच म्हणून उपस्थित होते. तसेच विविध महाविद्यालयाचे टीम मॅनेजर व खेळाडू उपस्थित होते.
या स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे आहे.६० किलो वजन गट प्रथम क्रमांक प्रणय चोरगे.आबासाहेब मराठे कॉलेज, राजापूर, व्दितीय क्रमांक हर्ष थले पीपीईएस कॉलेज अलिबाग, तृतीय क्रमांक आनंद राऊळ एस.पी.के.कॉलेज सावंतवाडी यांनी प्राविण्य संपादन केले आहे. पुढील स्पर्धेसाठी ६५ किलोवजनगट श्री. हेमंत पवार आय. सी. एस कॉलेज खेड व्दितीय क्रमांक प्रितम कांजर आबासाहेब मराठे कॉलेज राजापूर, ७० किलोवजनगटात प्रथम किशोर म्हापदी आय. सी. एस. कॉलेज खेड ८० किलोवजनगटात आयुष सुर्वे गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी, या खेळाडूंची पुढील मुंबई विद्यापीठ स्पर्धेकरीता निवड झाली. वरील स्पर्धा साईदरबार हॉल वेंगुर्ला येथे घेण्यात आल्या. तसेच या स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या.
या स्पर्धेसाठी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव जयकुमार देसाई पेटून कौन्सिल मेंबर श्री दौलतराव देसाई प्रशासन अधिकारी डॉ. सौ. मंजिरी मोरे देसाई यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. या स्पर्धेचे नियोजन क्रीडासंचालक प्रा. जे.वाय नाईक व डॉ. कमलेश कांबळे यांनी केले.