चंदीगडमध्ये माजी पोलिसांच्या घरी ग्रेनेड स्फोट; १ अटक २ संशयित फरार. संशयित फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून दोन लाखांचे बक्षीस जाहीर.
चंदीगड.
चंदीगड शहरातील उच्च दर्जाच्या सेक्टर १० भागात एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरावर ग्रेनेड स्फोट घडवून आणल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणातील अन्य दोन संशयित फरार असून पोलिसांनी पकडण्यासाठी त्यांच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.
निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरावर ग्रेनेड स्फोटाची घटना बुधवारी (११ सप्टेंबर) सायंकाळी ५.३० वाजता घडली, या स्फोटाच्या प्रभावामुळे खिडक्या आणि फुलांच्या भांडींचे नुकसान झाले, असे पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, सूत्रांनी इंडिया टुडे टीव्हीला सांगितले की, स्फोटाच्या काही वेळापूर्वी तीन लोक ऑटोरिक्षातून घटनास्थळी आले होते.हा स्फोट इतका मोठा होता की त्याचा आवाज दुरूनही ऐकू आला.स्फोट झाल्याचा क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.फुटेजमध्ये, एक ऑटोरिक्षा वेगाने जाताना दिसत आहे.